Kaspathar: धक्कादायक! कासपठारवर बिबट्याने थेट दुचाकीस्वारावर केला हल्ला

Satara News : कास पठार परिसरातील चिकणवाडी (कुसुंबी) गावातील गणेश दगडू चिकणे वय ३७ याच्यावर रविवारी रात्री अकराच्या सुमारास गावाजवळच बिबट्याने दुचाकी चालवत असताना हल्ला करून गंभीर जखमी केले.या हल्ल्याने डोंगर माथ्यावरील गावात खळबळ उडाली असून थेट वस्तीजवळच हल्ला झाल्याने लोकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (lepord Attack)

या बाबत सविस्तर वृत्त असे, गणेश चिकणे हा रात्री अकराच्या सुमारास कुसुबीमुरा गावातून आपल्या चिकणवाडी गावाकडे दुचाकीवरून येत होता. चिकणवाडी गावच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ मुख्य रस्त्यावर आला असताना अचानक बिबट्याने उडी मारून गाडीवरून खाली पाडले. बिबट्याने मानेला, हाताला व पायाला गुडघ्याजवळ पंजे मारून व चावा घेऊन जखमी केले.

केवळ जातीचा उल्लेख केला म्हणून ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा होऊ शकत नाही, उद्देश महत्त्वाचा- हायकोर्ट

अचानक झालेल्या हल्ल्याने गणेशने आरडाओरडा करताच बिबट्या निघून गेला. त्यानंतर त्याने फोन करून घरी पत्नीला झालेला प्रकार सांगितल्यानंतर गावातील सोपान चिकणे व इतर ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी गेले. त्यानी तातडीने कुसुंबीचे सरपंच मारूती चिकणे याना कल्पना दिली.

त्यानंतर पुढील उपचारासाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन प्राथमिक माहिती घेतल्यावर उपचार करण्यात आले. आज वनविभागाच्या वतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येईल.

कुसुंबीमुरा, चिकणवाडी, सह्याद्रीनगर हा परिसर जंगल व्याप्त असलेने वन्य प्राण्यांचा वावर असतो. पण मानवावर बेट हल्ल्याच्या घटनेने या परिसरातील नागरिकांची चिंता वाढली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच मारूती चिकणे यांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply