Satara News : धनगर आरक्षणासाठी सातारा- पंढरपूर महामार्गावर रास्ता राेकाे, वाहतुक ठप्प

Satara News : म्हसवड येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाच्या 14 व्या दिवशी धनगर समाज आज (शुक्रवार) अचनाक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेकडाे आंदाेलकांनी सातारा पंढरपूर महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले. 

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगड ऐवजी धनगर या शब्दाच्या दुरुस्तीची शिफारस करावी या प्रमुख मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे 13 दिवसांपासून धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदाेलनामध्ये काहींनी उपाेषण सुरु केले आहे.

Nagar News : विविध मागण्यांसाठी हजारो वकिलांचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आंदाेलकांनी उपोषण स्थगित करावे यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदाेलकांशी चर्चा केली. त्यावेळी आंदाेलकांनी बैठकीची तारीख निश्चित झाल्याशिवाय आंदाेलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान आज धनगर समाज अचनाक रस्त्यावर उतरला. शेकडाे जणांनी एकत्रित येत सातारा पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोकाे आंदाेलन केले. सुमारे एक तासाहून अधिक वेळ हे आंदाेलन सुरु राहिल्याने सातारा पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply