Satara Accident News : २० ते २५ प्रवाशांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल; भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू

Pasarni Ghat: अपघाताची मालिका थांबता थांबत नाहीये. सातारा येथून देखील अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आलीये. पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या बसचा बुवा साहेब मंदिराजवळ अचानक ब्रेक फेल झाल्यानं बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पसरणी घाटात अवघड वळणावर बस असताना अचानक ब्रेक फेल झाल्यानं बस घाटात मागच्या दिशेला गेली. यावेळी पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकी स्वाराच्या अंगावर आली. त्यामुळे दुचाकीवरील एका महिलेसह अन्य २ जण बसखाली आले. यात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला.

जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी घेणाऱ्या दहशतवाद्यांना मंडणगडातील संशयितानं पुरवली आर्थिक रसद; ATS तपासात निष्पन्न

बस चालकाने ही बस नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने याच बसखाली दुचाकी आल्यानं प्रिती बोधे यांचा यात मृत्यू झाला. तसेच बस कठड्याला अडकली अन्यथा आणखी मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती. या बसमध्ये 20 ते 25 जण प्रवास करत होते अशी माहिती आहे. पोलिसांकडून पंचनामा झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply