Satara News : डोक्याला गंभीर इजा, छातीला जोरदार मार, महाराष्ट्रातील लेकीचा अमेरिकेत अपघात; आई-बापाची पोरीला बघण्यासाठी घालमेल

Satara : अमेरिकेत अपघातात जखमी झालेली नीलम शिंदेवर सध्या उपचार सुरू आहेत. तिच्या पालकांना अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे पालक व्हिसासाठी संघर्ष करत आहेत. त्यांना आपल्या मुलीजवळ जाऊन तिला भेटण्याची तीव्र इच्छा आहे.

नेमकं प्रकरण काय?साताऱ्यातील कराड तालुक्यात असलेल्या उंब्रज गावातील नीलम शिंदे (वय ३५) वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्या ११ दिवसांपूर्वी अपघात झाला होता. तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, मरणाच्या दारात असताना तिच्याजवळ जाण्यासाठी तिच्या पालकांना भारतातून व्हिसा मिळत नाहीय.

Pune News : पुण्यातील शाळेचा मनमानी कारभार, शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

नीलम हीचा १४ फेब्रुवारी २०२४ रोजी व्यायामासाठी जात असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघातात नीलम हिचे दोन्ही हाता-पायांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या छातीलाही जोरदार मार लागला असल्याने ती सध्या कोमात आहे. नीलमसोबत राहणारी तिची रूममेट देखील महाराष्ट्रातील असून तिने लगेच उंब्रजमधील नीलमच्या पालकांना अपघाताबद्दल माहिती दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, रक्तातील नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचं अमेरिकेतील पोलीस सांगितलं आहे.

अद्यापही नीलमच्या पालकांना व्हिसा मिळत नाहीये. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून व्हिसासाठी संपर्क करण्यात आला. तरीही त्यांना व्हिसा मिळण्याबाबत मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट व्हिसा आँफिसकडून कोणतीही दाद मिळत नाहीय.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply