Pahalgam Terror Attack : मुलीच्या डोळ्यासमोर बापाचा जीव घेतला, पुण्यातील दोघांना दहशतवाद्यांनी मारले

 

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी दहशतवाद्याने २८ पर्यटकांचा जीव घेतला. नाव विचारले, आयडी पाहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या वेशात आले अन् पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते, पण त्यांची ती ट्रीप अखेरची ठरली.

जम्मूमध्ये पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दोन कुटुंब फिरण्यासाठी जम्मूला गेले होते. त्यांच्या कुटुंबसमोरच जगदाळे आणि गणबोटे यांचा दहशतवाद्याने जीव घेतला. संतोष जगदाळे, प्रगती जगदाळे, आसावरी जगदाळे हे आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेले होते. संतोष जगदाळे यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मुलगी आसावरी हिच्यासमोरच दहशतव्याने संतोष जगदाळे याचा जीव घेतला. या हल्ल्यात प्रगती जगदाळे गंभीर जखमी झाल्या. लेकीच्या डोळ्यासमोरच दहशतवाद्याने बापाचा जीव घेतला.

Jammu and Kashmir : काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी; देशभरात संतापाची लाट

संतोष जगदाळे यांचा पुण्यात इंटेरियरचा व्यवसाय आहे. दहशतवादी हल्ल्यात संतोष गंभीर जखमी झाले होते. तर पत्नी आणि मुलगी जखमी झाले होते. उपचारावेळी संतोष यांचा मृत्यू झाला. पुण्यात कर्वेनगर परिसरात त्यांचं घर आहे. त्यांच्यासोबत त्यांचे दोन भाऊ या ठिकाणी राहतात.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावर संध्याकाळी ६ वाजता येणार आहे. जगदाळे आणि गणबोटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. विशेष विमानाने त्यांचे पार्थिव पुण्यात आणले जाणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातून काश्मीरला फिरायला गेलेले पर्यटक आज परत येणार आहेत. विजय पारगे यांच्यासह पुण्यातील एकूण 22 जणांचा ग्रुप या हल्ल्याच्या आधीच पहेलगाममधून बाहेर पडला होता. पुण्यातून गेलेले 22 पर्यटक जम्मू काश्मीरच्या विमानतळावर दाखल झाले आहेत. जम्मू काश्मीर ते मुंबई या विमानाने पुण्यातील 22 पर्यटक दुपारी मुंबईत येणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply