Sanjay Raut on Suresh Dhas :'सुरेश धस कधीही पलटी मारतील', धस-मुंडेंच्या भेटीवरून राऊत कडाडले


Sanjay Raut on Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला २ महिने उलटले. या प्रकरणावरून वाल्मिक कराड आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय देशमुख यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, १४ फेब्रुवारीला सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वादळ निर्माण झालं आहे.

एकीकडे टीका दुसरीकडे भेट, यामुळे धस यांच्यावर चहुबाजूने टीका केली जात आहेत. मुंडेंच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांची विचारपूस करायला गेलो असल्याचं धस यांनी सांगितलं. दरम्यान, दोघांमध्ये समेट झालं आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धस यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. धस कधीही पलटी मारतील, असं संजय राऊत म्हणाले.

GBS : सांगलीत खळबळ, जीबीएसमुळे १४ वर्षांच्या मुलासह २ जणांचा मृत्यू

धस कधीही पलटी मारतील

संजय राऊत यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. 'मला बीडमधील एका प्रमुख नेत्यानं आधीच सांगितलं होतं. सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवू नका. संतोष देशमुख कुटुंबासाठी लढतील आणि त्यांना न्याय देतील, असं मला वाटलं होतं.

पण काही लोकांनी मला समजावलं. त्यांची बाजू घेऊ नका असं सांगितलं. धस कधीही पलटी मारतील. सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे तिघंही एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची असून, दुर्देवानं हे सत्य होत असल्याचं दिसत आहे', असं संजय राऊत म्हणाले.

अश्रूंचा बाजार मांडला

'मला खूप वाईट वाटतंय, एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार मांडणे अत्यंत चुकीचे आहे. लहान मुलांना आशा होती, हा माणूस आपल्याला न्याय देईल. जर धस यांनी हे कृत्य केलंच असेल तर, देव त्यांना क्षमा करणार नाही. खोटारडेपणा करत जर त्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर, त्यांना बीडच काय राज्याची जनता लक्षात ठेवेल', अशा शब्दात राऊत यांनी रोष व्यक्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply