Sanjay Raut on Government : सरकारचं 'डेथ वॉरंट' निघालं,15 दिवसात सरकार कोसळणार; संजय राऊतांच्या दाव्याने चर्चेला उधाण

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावच्या पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण तापलं असून ठाकरे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या सभेपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 

आगामी 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर या सरकारचं 'डेथ वॉरंट' निघाले असल्याचं देखील राऊत म्हणाले आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसात गडगडल्या शिवाय राहणार नाही.

तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा 'डेथ वॉरंट' निघालेलं आहे येत्या 15 ते 20 दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरे यांचा पाचोरा दौरा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी ११.०० वाजता मुंबई येथून जळगावकडे खाजगी विमानाने प्रयाण करतील. दुपारी १२.०० वाजता ते जळगाव विमानतळ येथे दाखल होतील आणि येथून वाहनाने पाचोराकडे रवाना होतील. यानंतर दुपारी १.३० वाजता पाचोरा शहरात वरखेडी फाटा येथून महाराणा प्रताप चौकपर्यंत मोटरसायकल रॅली काढली जाईल आणि महाराणा प्रताप चौक येथे स्वागत केले जाईल. दुपारी २.०० वा. ते ४.३० पर्यंत निर्मल सिड्स रेस्ट हाऊस येथे जेवण आणि राखीव वेळ असेल.

दुपारी ४.३० वा. ते ५.३० ते निर्मल सिड्स समोरील नवीन इमारतीजवळ मोकळ्या जागी जळगाव जिल्ह्यातील उद्योजक यांच्याशी चर्चा करतील. तसेच निर्मल सिड्स येथील भारतातील प्रथम अत्याधुनिक नवीन तयार करण्यात आलेल्या लॅबचे उद्घाटन करतील. माजी आमदार आर ओ पाटील यांचा ११ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देखील ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply