Sanjay Raut : शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला माहित पण, संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर प्रहार

Sanjay Raut : निवडणूक आयोगासमोर दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरु आहेत. शिवसेना कोणाचे आणि राष्ट्रवादी कोणाची, हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनी केलं. पाकिस्तानला माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे. पण  निवडणूक आयोगाला माहित नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

Manoj Jarange : आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, उगाच गाजर दाखवू नका; अन्यथा....जरांगे पाटलांचा इशारा

बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील झालेला होता. ज्यांनी बेईमानी केली होती त्यांनी फक्त आमदार पळवले पक्ष नाही. पक्षावर ताबा करण्यासाठी त्यावेळी त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिली होती. पण इलेक्शन कमिशनने त्याचा संदर्भ घेतला नाही. एकतर्फी निर्णय घेतला. आज राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील तोच प्रश्न उपस्थित होत आहे. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत, तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की राष्ट्रवादी कोणाची असे राऊत म्हणाले. देशाचं दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशनला कळत नाही या पक्षाची मालकी नेतृत्व कोणाकडे आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *