Sanjay Raut : पुण्यातील लाडले भाऊ ड्रग्सच्या आहारी गेलेत; अर्थसंकल्पावरून संजय राऊतांचा महायुतीला टोला

Sanjay Raut : घराघरात लाडला भाऊ, लाडली बहीण या योजना ठिक आहेत. मात्र पुण्यात घराघरातील लाडले भाऊ ड्रग्सच्या आहारी गेलेत, नाशिकमध्ये देखील तरुण ड्रग्सच्या आहारी गेलेत त्याचं काय? राज्यात ड्रग्स येतंय कुठून? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरलं आहे.

काल राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात वित्तमंत्रीअजित पावारांनी विविध योजनांच्या घोषणा केल्या. त्यात त्यांनी लाडकी बहीण या योजनेची सुद्धा घोषणा केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका करत म्हटलं होतं, लाडका भाऊ योजना का राबवत नाही.

Maharashtra Politics : अजित पवार यांना मोठा धक्का बसणार? बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, आम्ही लाडका भाऊ योजना केली आहे. १० हजार रुपये देत आहोत. पण त्यांनी अडीच वर्षे लाडका बेटा योजना राबवली, त्याचे काय, असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यावरून पुन्हा एकदा संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.ड्रग्सच्या पैशांतून निवडणूका लढवल्या!

संजय राऊतांनी पुढे माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "ड्रग्सच्याआलेल्या पैशांतून आताची निवडणूक लढवली गेली, असा घणाघाती आरोप केला आहे. पुण्यातील एक पिढी नशेच्या आहारी जाताना दिसत आहे. एकीकडे कारवाईचं नाटक दिसत आहे, मात्र पोलीस आणि राजकीय पाठबळ उसल्याशीवाय इतक्या मोठ्याप्रमाणात ड्रग्सचा व्यवहार होईल असं वाटत नाही. सर्व ड्रग्स गुजरातमधून येत आहेत. नाशिक आणि पुणे ही ड्रग्ससंदर्भातील महत्वाची केंद्र झाली आहेत."

पुढे १ रुपयांचा विमा यावर बोलताना राऊतांनी म्हटलं की, "हे सरकार बोगस आहे, मोदी शहा याचं डूब्लिकेट सरकार आहे. लोकसभा निवडणूकीत अनेक मतं विकत घेतली आहेत. त्यांना प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या स्ट्राईक रेट अमरावती जास्त आहे,याकडे लक्ष दिले पाहिजे. ", असा हल्लाबोल राऊतांनी महायुती सरकारवर केला आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply