Sanjay Raut : 'काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा; पंतप्रधान मोदींच्या भाषणावरुन संजय राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. आपल्या संपूर्ण भाषणादरम्यान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधताना काँग्रेस घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदींच्या या भाषणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

" पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणि देशाच्या धोरणावर बोलायचं असत. 'ही सगळी प्रचारकी भाषण आहेत. देशाच्या प्रश्नावर त्यांनी साधा स्पर्श केला नाही, लडाख, दिल्ली, जम्मू काश्मीर यावर ते काहीही बोलले नाहीत, मग राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर काय बोलले ते?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Nagpur PSI End Life : ३४ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, नागपूरमधील घटना

काँग्रेसच्या भितीतून मुक्त व्हा...

"मोदींच्या भाषणात फक्त काँग्रेसवर टीका होती. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शिंदे यांचं सरकार आल्यावर राज्यात 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावर ते बोलले नाहीत," अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

शिंदे सरकारवर टीका..

"महाराष्ट्र गुंडगिरीचा अड्डा झाला आहे. त्यांनी नेमलेले मुख्यमंत्री राज्यात गुंड राज्य झाल आहे. मी यापुढे रोज गुंडांची माहिती देत राहील. मी त्यात पंतप्रधान आणि शाह यांना टॅग केले आहे. मुंबईतील एक माजी पोलीस अधिकारी या गुंडांच्या बैठका घडवून आणतो आहे, याचा लवकर मी पर्दाफाश करणार आहे," असा गौप्यस्फोटही संजय राऊतांनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply