Sanjay Raut | एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या अस्मितेचे शत्रू, राऊतांची सडकून टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन बंगल्यात झाली. त्यावेळी शिंदे यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. या भेटीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पहिली भेट होती.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी शिंदे यांच्यावर सडकून हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे शत्रू आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाह यांच्या मदतीने चोरली गेली. त्यामुळे ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाहीत.” या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू असून तो आम्हीच जिंकणार आहोत, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला. तसेच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमचे भांडण आहे आणि ते पुढेही राहील, मात्र हे भांडण वैयक्तिक नसून महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *