Sanjay Raut : खासदार संजय राऊत पुन्हा अडचणीत; कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, संजय राऊत यांच्याविरोधात ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर महिला संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर संजय राऊत यांच्यावर सुरूवातीला नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

संजय राऊत बेताल वक्तव्य करीत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते काही ही बडबडत असतात. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मालिन करण्याचे आक्षेपार्ह विधान करीत आहेत, असा आरोप ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. 

दरम्यान, मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारीवरून ठाणे पोलीसांनी संजय राऊतांविरोधात बुधवारी रात्री विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरूवारी ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने राऊत यांच्याविरोधात आंदोलन देखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

संजय राऊतांचे आरोप काय?

आपल्या जीवाला धोका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांनी एका गुंडाला सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 'ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे', असा आरोपही संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply