Sangli News : बेदाणा युनिटच्या नावाखाली बँकेची दोन कोटींची फसवणूक, ७ जणांवर गुन्हा दाखल

Sangli News : बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली एचडीएफसी बँकेची १ कोटी ९८ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेचे सहउपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयित डिस्ट्रिक्ट ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक आहेत. कंपनीमार्फत बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकिंग प्रकल्प उभा करण्यासाठी सांगलीतील एचडीएफसी बँकेची ऍग्रो स्ट्रक्चर फंड योजनेतून कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेने प्रकल्प उभारणीसाठी एक कोटी 98 लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले. वेल्डर कंपन्या गौरी कंट्रक्शन, अँड अथर्व मूव्हर्स, यमुना हाइट्स गुरुकृपा सोसायटी कोंढवा पुणे यांच्या नावावर बँकेने कर्ज मंजूर वर्ग केले.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला! तापमानात चढ-उतार होणार, अनेक ठिकाणी धुक्याची चादर

हा प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधनकारक होते. या संशयित सात जणांनी बँकेकडे तारण जमिनीवर प्रकल्प उभा करणार असल्याचे सांगितले होते. पण आज अखेर प्रकल्प उभारण्याकरता आणि कर्जाची रकमेची परतफेड न करता बँकेची १ कोटी ९८ लाख रुपयाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुकुंद हणमंत जाधवर (रा. बालवाड जि. सोलापूर), स्वप्नाली मुकुंद जाधवर (वय 27 रा. बालवाड जि. सोलापूर), सखुबाई हणमंत जाधवर (वय 61 रा. बालवाड जि. सोलापूर) विजय शैलेंद्र कराड (वय 31 रा. भालगाव जि. सोलापूर), राजाराम विठ्ठल खरात (वय 48 रा. एरंडोली जि. सांगली), अजित विष्णू दळवी (वय 48 रा. बेडग) आणि लता विठ्ठल जाधव (वय 38 रा. पायाप्पाचीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply