Sangli News : दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा पहिला निर्णय आमच्या सरकारनं घेतला : मुख्यमंत्री

Sangli News : आमचं सरकार लोकांच्या बांधावर जाऊन काम करते. सिंचनाचे 120 प्रकल्प आम्ही घेतले आणि जमिनी ओलिताखाली आणले. शेतकऱ्यांच्या मागे उभा राहण्याचे काम सरकार करत आहे. केवळ पोकळ घोषणा करणारे आपले सरकार नाही. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा पहिला निर्णय आमच्या सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी नमूद केले. इस्लामपूर (सांगली) येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाेलत हाेते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले सांगली जिल्ह्याचे नाव काढले की डोळ्यासमोर येत प्रति सरकार. ज्यांनी इंग्रजांना सळाे की पळाे करून साेडलं हाेते. या सांगली जिल्ह्यातून अनेक सामाजिक आणि राजकीय नेते घडले.

Chandrapur News : बल्लारपूरहून नागपूरला जाणारी कार चंद्रपूर पाेलिसांनी तपासली, 25 लाखाची रक्कम जप्त

शासनाच्या विविध योजना आहेत. त्या जनतेपर्यंत पाेहचाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहाेत. पूर्वी कामे हाेत नव्हती शासनाच्या याेजनांचे गरीबांना लाभ मिळत नसेल तर शासनाचा फायदा काय. म्हणून आम्ही शासन आपल्या दारी उपक्रम सुरु केला.

शासन आपल्या दारी म्हणजे काय तर घरी बसून काम होत नसतात. लोकांत जाऊन काम केले पाहिजे अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी आमचं सरकार लोकांच्या बांधावर जाऊन काम करते असे नमूद केले. ते म्हणाले सिंचनाचे 120 प्रकल्प आम्ही घेतले आणि जमिनी ओलिताखाली आणले.

शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याचे काम सरकार करीत आहे. पोकळ घोषणा करणारे आपले सरकार नाही. सरकार आल्यावर पहिला निर्णय आमच्या सरकारने पाणी वळवण्याचा आम्ही निर्णय घेतला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply