Sangli : यात्रेवरून परतताना सांगलीत मध्यरात्री तरुणांची हुल्लडबाजी; पोलिसांकडून चोप

Sangli :  कर्नाटकातील चिंचणी येथे माघी पौर्णिमेला मायाक्का देवीच्या यात्रेला अनेक भाविक गेले होते. यात्रा संपल्यावर घरी परत येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुण रस्त्याने हुल्लडबाजी करत येत होते. सांगलवाडीतील या तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यामध्ये ३५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर काहीं तरुणांनी गाड्या रस्त्यावर टाकून पळ काढला आहे.

कर्नाटक राज्यातील चिंचणी येथे माघी पौर्णिमेला दरवर्षी मायाक्का देवीची यात्रा भारत असते. या यात्रेला बैलगाडीतून किंवा घोडागाडीतून शेकडो भावी परंपरेप्रमाणे जात असतात. तर अनेकजण आपापल्या पद्धतीने दुचाकी किंवा गाडीने जात असतात. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील अनेकजण यात्रेला जात असतात. नुकताच हि यात्रा पार पडली असून भाविक यात्रेला जाऊन परतत आहेत. 

Pune : पुण्यात पेट्रोलऐवजी पाणी, नागरिकांची वाहनं अर्ध्या रस्त्यात बंद; शहरातील पंपावरचा प्रकार

मायाक्का देवीची यात्रा संपल्यावर भाविक घरी परतत असतात. याचवेळी घोडागाड्या पळवत असताना त्यासोबत दुचाकी असतात. असे प्रत्येक वर्षी असते. मात्र रविवारी रात्री दोन हजाराहून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून सांगलीकडे परत येत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत हुल्लडबाजी करत घराकडे येत होते. 

जोरजोरात आवाज करत दुचाकीने जाणाऱ्या तरुणांच्या हुल्लडबाजीने नागरिक घाबरून जागे झाले होते. तर याबाबत पोलिसांना देखील माहिती मिळाली होती. दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चाप लावण्यासाठी सांगलीच्या हार्बर रोड टिळक चौकात अडवून चांगलाच चोप दिला. तर यावेळी काही तरुणांनी गाड्या टाकून पळ काढला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply