Sangli News : सांगलीत रास्ता रोको आंदोलन; विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलेला आहे. सांगली इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाट्या येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चक्काजाम करण्यात आले. 

५० हजार प्रोत्साहन अनुदान तातडीने शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावेत, वीज कनेक्शन मोहिम थांबवावी, ऊस तोडनीसाठी पैसे मागणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत, द्राक्षाला हमी भाव जाहीर करावा, एक रकमी एफआरपी अश्या विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आल्‍या आहेत. यासाठी राज्‍यभर आंदोलन पुकारले आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तर यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. आंदोलन ठिकाणी मोठा  पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *