Sangli GBS : सांगलीत जीबीएसचा धोका वाढतोय; जिल्ह्यात रुग्ण संख्या पोहचली अकरावर

Sangli GBS : गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएसचा धोका सांगली जिल्ह्यात वाढत चालल्याचे पाहण्यास मिळत आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्येत आणखी भर पडत असल्याने रुग्ण संख्या आता ११ वर पोहचली आहे. जिल्ह्यातील अवघे ६ रुग्ण असून बाकीचे रुग्ण अन्य जिल्ह्यातील आहे. यात कर्नाटकातील दोन रुग्णांचाही समावेश आहे.

राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राज्यात पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान राज्यात जीबीएसची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने चिंता वाढत आहे. त्या तुलनेत सांगलीत या आजाराची साथ आटोक्यात असली तरी अन्य जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काही रुग्ण सांगलीत उपचार घेत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे.

बाहेरील रुग्णाचा समावेश

सांगलीत सध्या जीबीएसचे ११ रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये कोल्हापूर, पूणे, सातारा, रायबाग, संकेश्वर येतील रुग्णांचा समावेश आहे. तर सांगली शहरातील एक तसेच आष्टा, वाळवा, इस्लामपूर, विटा, आटपाडी येथील रुग्णही उपचार घेत आहेत. ज्या ठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या घराच्या शेजारी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे.

तातडीने उपचार घेण्याचे आवाहन

जीबीएस आजारात रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच त्याच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे शरीरात अचानक तीव्र बधीरपणा, मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे, अचानक हातापायांतली ताकद नष्ट होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. नागरीकांनी घाबरून न जाता लक्षणे दिल्यास तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply