Sangli Farmer : धमकी अन् त्रासाला शेतकरी कंटाळला, संपवलं आयुष्य; मृत्यूपूर्वी केला व्हिडिओ

Sangli Farmer : जमीन बळकावण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी आणि त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्यानं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या केली आहे. कैलास वीरभद्र चौधरी (वय वर्ष ४५) असे शेतकऱ्याचे नाव असून, कीटकनाशक प्राशन करून त्यानं आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सांगलीच्या मिरज तालुक्यातील लिंगनुर गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावातील पोपट बनसोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कैलास बनसोडे हा अल्पभुधारक शेतकरी होता. त्यांनी काही वर्षांपूर्वी पोपट बनसोडे याला २२ गुंठे जमीन विकली होती. या जमिनीतील १४ गुंठे जमीन शिल्लक राहिली होती. या शिल्लक राहिलेल्या जमिनीवर देखील त्याचा डोळा होता. १४ गुंठे जमिनही मलाच दे असा तगादा बनसोडे यानं चौधरी यांच्या मागे लावला होता. मात्र, चौधरी यांना ती जमिन विकायची नव्हती. दोघांमध्ये जमिनी्च्या वादातून भांडणं झाली होती. बनसोडे यानं चौधरी यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता.

Pune : श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूकीत उद्या बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद

चौधरी यांनी बनसोडे विरूद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. तरीही पोपट हा वारंवार त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करीत होताच. तसेच पीक पेरण्यासही बनसोडे याने प्रतिबंध केला होता. याच त्रासाला कंटाळून चौधरी यांनी गुरूवारी सांयकाळी राहत्या कीटकनाशक प्राशन करीत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी चौधरी यांनी व्हिडिओ शुट केला आणि सोशल माध्यमांमध्ये व्हायरल केला.

कीटकनाशक प्यायल्यानंतर त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. पतीच्या मृत्यूसाठी बनसोडे जबाबदार आहे. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चौधरी यांच्या पत्नीनं ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply