Sangli Court : युवकाच्या खूनप्रकरणी ५ जणांना जन्मठेप; सांगली न्यायालयाचा निर्णय

Sangli Court : सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आग्रन धुळगाव येथे भरलेल्या जत्रेतील तमाशात वाद होऊन एका युवकाची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणात आरोपी असलेल्या पाच जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच या खटल्यात प्रत्यक्ष मारेकऱ्यांसोबत सहभाग घेणाऱ्यांना देखील आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ४ डी. वाय. गौड यांनी ही शिक्षा सुनावली आहे. आठ वर्षांनंतर कुटुंबाला न्याय मिळाला आहे.

२०१७ मध्ये कवठेमहांकाळच्या अग्रण धुळगाव येथे घडलेल्या खून प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील आग्रन धुळगाव या गावात जत्रा भरली होती. या जत्रेत रात्री आयोजित तमाशात काही जणांमध्ये वाद उद्भवला होता. या वादातून अशोक तानाजी भोसले या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. या खून खटल्याची सुनावणी २०१७ पासून सुरू होती.

Kalyan Accident: कल्याणमध्ये केडीएमसीच्या ट्रकने दोघांना चिरडले, आईसह मुलाचा जागीच मृत्यू

आठ वर्षानंतर निकाल

गावातील तमाशा दरम्यान दंगा केल्याची तक्रार केल्यामुळे अशोक भोसले या तरुणाची हत्या करण्यात आली होती. दरम्यान मागील आठ वर्षांपासून खून खटल्याची सुनावणीदरम्यान खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्षीदारांची साक्ष आणि पुरावे पाहून सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ४ डी. वाय. गौड यांनी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या कामी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.

यांना सुनावण्यात आली शिक्षा

सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्यांमध्ये संदीप दादासो चौगुले (वय २६), विशाल बिरुदेव चौगुले (वय २३), नानासो उर्फ सागर माणिक चौगुले (वय २०), कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनप (वय २५) आणि विजय आप्पासो चौगुले (वय २३) अशी जन्मठेप झालेल्या तरुणांची नावे आहेत. या खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यानी पाहिले. सांगली जिल्ह्यातील एकाचवेळी पाच जणांना आजन्म कारावासाची शिक्षा झालेली सांगली जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply