Sangli Crime : बनावट ग्राहकाची जन्मतारीख ऐकताच भोंदूबाबा म्हणाला..अघोरी पूजा मांडताच झाला भांडाफोड

Sangli : सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजमध्ये एका भोंदू बाबाचा भांडाफोड करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने करनी आणि अघोरी पूजा करणाऱ्या बाबाकडे एक बनावट ग्राहक पाठवून करणी घालविण्यासाठीची पूजा मांडली. यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बाबाला रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजमध्ये बाबूजी लखनऊ या नावाने मोहम्मद मतीहउल्ला हा परिचित बाबा होता. अनेक वर्षापासून त्याचा या परिसरात वास्तव्य आहे. या भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे काही तक्रारी आल्या होत्या. यामुळे अंनिस या भोंदूबाबाच्या तपासात होते. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक डमी बनावट ग्राहक या भोंदूबाबाकडे पाठविला.

Ratnagiri Water Shortage : रत्नागिरीकरांनो काटकसरीने वापरा पाणी; एप्रिलपासून शहरात होणार पाणी कपात

व्यवसायात तोटा; करणी केलीय..

डमी ग्राहक पाठवून या भोंदू बाबाचा अघोरी प्रकार उघडकिस आणला आहे. बनावट ग्राहक या बाबाकडे पाठवला आणि व्यवसायात तोटा होत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर बाबाने त्याची जन्मतारीख विचारली. जन्म तारीख सांगताच कोणीतरी करनी केल्याचे या बाबाकडून सांगण्यात आले. करणीवर उपाय करण्यासाठी नऊ हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारच्या रात्री दहा वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असे सांगितले.

अघोरी पूजा मांडताच बाबाला पकडला

त्याप्रमाणे कसबे दिग्रज येथे अघोरी पूजा देखील करण्यात आली. यावेळी काळी बाहुली, लिंबू, पिना, हळद-कुंकू असे बरेच साहित्य मांडून अघोरी पूजा मांडली होती. याबाबत सांगली ग्रामीण पोलीसाना अनिसच्या कार्यकर्ते यांनी ही अघोरी पूजा होणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पूजेचे साहित्य आणि बाबाला ताब्यात घेतले. या बाबा विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply