Sangamner Jail Crime News : संगमनेर कारागृहातून फरार झालेले चारही आरोपी जेरबंद, एका शेतात बसले होते लपून

Sangamner Jail Crime News : संगमनेर कारागृहातून फरार झालेल्या चार आरोपींना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून जेरबंद करण्यात आले आहे. संगमनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला या आरोपींना ३६ तासात शोधून काढण्यात यश आले असून आरोपींना मदत करणाऱ्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. फरार झालेले आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एका शेतात लपून बसले होते.

संगमनेर कारागृहाचे गज कापून हे चारही सराईत गुन्हेगार बुधवारी पहाटे (ता.८) फरार झाले होते. सकाळी सुरक्षारक्षकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर खळबळ माजली होती. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. या चारही आपोपींना गंभीर गु्न्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे.

Hingoli Earthquake News : हिंगोलीकर साखर झोपेत असताना जमिनीतून गूढ आवाज आणि हादरे, नागरिकांमध्ये घबराट

यातील एका आरोपीवर खून, दोघांवर अत्याचार आणि एकावर खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान हा कट गेल्याकाही दिवसांपासून सुरू होता. हे काम एका दिवसात होणे शक्य नाही. बराकीच्या कूलरच्या आवाजाचा फायदा घेऊन कारागृहाचे गज कापले असावेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी राज्यभर पोलिसांची अनेक पथके धाडण्यात आली होती. अखेर ३६ तासातच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply