Sana Khan case : सना खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीच्या घरातील मोबाईल आणि लॅपटॉप जप्त

Sana Khan case : सना खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. सना खान हत्या प्रकरणात मृतदेह मिळालेला नाही. मात्र, पोलिसांनी अद्याप या प्रकरणाचा तपास थांबवलेला नाही. या प्रकरणात आता पोलिसांनी अमित साहू याच्या आईच्या घरातून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. 

सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहूला प्रॉडक्शन वारंटवर घेत त्याच्या आईच्या घरातील मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. तसेच मोबाईल आणि लॅपटॉप सना खानचा आहे की अमित साहुचा आहे, याचा तपास सायबर तज्ज्ञ यांच्या अहवालातून स्पष्ट होईल.

Buldhana News : ट्रॅक्टर मोर्चा प्रकरणी सुमारे १५० शेतकऱ्यांवर गुन्हा; खामगावात काढला होता मोर्चा

अमित साहूची पोलिग्राफ टेस्ट आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्यासाठी गेल्या वेळी कोर्टाने परवानगी नाकारली होती. यावेळी आरोपीची संमती घेऊन त्यासाठी पुन्हा कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी झाल्यानंतर जो काही निर्णय होईल, त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

सना खान या भाजप अल्पसंख्याक सेलच्या नेत्या होत्या. सना खानचे कुख्यात गुन्हेगार अमित साहू याच्याशी प्रेम प्रकरण होतं. घरच्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून सना आणि अमितने लग्न केलं. अमित साहू याला सना खानच्या जोरावर राजकारण प्रवेश करायचा होता.

अमितने सनाला काही राजकीय नेत्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडलं होतं. त्याने त्यांच्या शारीरिक संबंधाच्या चित्रिफितीही तयार केल्या होत्या. अमित अनेक नेत्यांना चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल करायचा. याच अमित साहूने गेल्या वर्षी २ ऑगस्टला सनाच्या डोक्यात वार करून हत्या केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply