Sana Khan: भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्या! मृतदेह मध्य प्रदेशातील हिरन नदीत फेकला, एका आरोपीला अटक

Sana Khan: नागपूर शहरातील भाजपच्या सक्रिय पदाधिकारी सना खान यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. सनाच्या हत्याकांडात मुख्य आरोपी अमित शाहूचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक करण्यात आली आहे. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. जबलपूर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे. नागपूर पोलिसांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

भाजपा नेत्या सना खान १ ऑगस्ट रोजी जबलपूरमधील मित्र अमित ऊर्फ पप्पू साहू याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सना खान अमितच्या घरी मुक्कामी होत्या. अमितचा आणि सना खान या दोघांमध्ये चांगले संबंध होते. त्यामुळे अमित शाहूच्या पोलीस दलात नोकरीवर असलेल्या पत्नीला संशय आला. २ ऑगस्टपासून सना बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्या आईने मानकापूर पोलिसातबेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

Pandharpur Crime : प्रेमविवाहाला विरोध केल्याने वडिलांना मुलीकडून बेदम मारहाण.. प्रियकराच्या मदतीने रचला डाव; तालुक्यात खळबळ

सना खान यांच्या आईने तक्रार दिल्याने मानकापूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेल्यानंतर अमित शाहू हा फरार झाला होता. त्याने ढाब्याला कुलूप लावले होते. नोकरही गायब झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करत अमितचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. गौड याने अमितच्या कारच्या डिक्कीमध्ये रक्त सांडलेले होते.

कारची डिक्की स्वच्छ केल्याची कबुली दिली. सना हिचा मृतदेह हिरन नदित फेकल्याचेही त्याने सांगितले. सना खान हत्याकांडाचे प्रकरण जबलपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून आरोपी जीतेंद्रलाही गोराबाजार-जबलपूर पोलिसांनी अटक केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply