Buldhana Bus Accident: विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातासंदर्भात मोठी अपडेट; DNA अहवाल प्राप्त, सर्व मृतकांची ओळख पटली

Samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव खुटा परिसरात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात जवळपास २५ प्रवाशी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आगीत मृतदेह पूर्णपणे होरपळल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. डीएनए अहवालानंतर आता सर्व मृतांची ओळख पटली आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 'डीएनए' अहवाल प्राप्त झाला असून सर्व प्रवाशांची ओळख पटली असल्याची माहिती तपास अधिकारी प्रदिप पाटील यांनी दिली आहे. याशिवाय घटनास्थळीच्या अवशेषांचे फॉरेन्सिक अहवाल देखील प्राप्त झाल्याची माहिती देखील पूरक यांनी दिली.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले असून, 'क्लेम' करणे व अन्य कार्यवाहीसाठी ही प्रमाणपत्रे सहाय्यक ठरणार आहेत, अपघात स्थळ परिसरातील अवशेष, वस्तू, उपकरणे, सुटे भाग आदींची' फॉरेन्सिक' चाचणी करण्यासाठी अमरावतीला पाठविण्यात आले होते.

Hadapsar News : भाडेकरूची माहिती सादर करा अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्यात येईल - रविंद्र शेळके , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर

त्याचा अहवालही प्राप्त झाल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, घटनेनंतर दुर्घटनाग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सचे 'फायर ऑडिट' करण्यात आले होते, एका खाजगी संस्थेतर्फे ही कार्यवाही करण्यात आल्यावर त्याचा अहवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला आहे.

मात्र निर्णायक असलेला बुलढाणा उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. यात परिवहन विभागाच्या पथकाने केलेली तपासणी, वाहनात करण्यात आलेले 'मोडीफिकेशन' नियमानुसार होते का? वाहनाचे आणिबाणीच्या प्रसंगात वापरण्यात येणाऱ्या 'एक्सिट डोअर' ची स्थिती याची कारणमीमांसा अपेक्षित आहे हा अहवाल खटल्यातही महत्वाचा घटक ठरू शकतो.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply