Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग;

Samruddhi Mahamarg Accident : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र थांबता थांबत नाहीये. दिवसागणिक समृद्धी महामार्गावरील अपघाताचं प्रमाण वाढतच चाललं आहे. यातील बहुतांश अपघात अतिवेगाने वाहन चालवल्याने घडत आहेत. तर काही वाहनांचे टायर फुटल्याने देखील अपघाताच्या घटना घडत आहे.

दरम्यान, केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. नाशिकहून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ट्रकचा बुलढाण्याजवळील मेहकरजवळ अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन थेट डिव्हायडरला जाऊन धडकला. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रकला अचानक आग लागली.

Devendra Fadnavis On Barsu Protest : बारसूतील आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचालक आणि वाहकाने वेळेवर ट्रकबाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

दरम्यान, ट्रकला आग इतकी भीषण होती, दुरपर्यंत आगीचे लोट दिसून येत होते. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिक महामार्गाच्या दिशेने धावत आले. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply