Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वरील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ७ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार : CM एकनाथ शिंदे

Samruddhi Mahamarg Accident : 'मुंबई -नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यासह जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यात १२ जणांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले. याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

Pune News : मीरा बोरवणकरांचा 'दादां'वर गंभीर आरोप; येरवड्यातील पोलिसांची जमीन विक्रीसाठी दबाव आणल्याचा पुस्तकात दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या घटनेवर ट्वीट केलंय.

शरद पवारांचे ट्वीट

"समृद्धी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हिच प्रार्थना!"

"समृद्धी महामार्गावर आजवर एकूण ७२९ अपघात झाले आहेत. यात २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत. तर ४७ अपघातांच्या घटनेत आजवर १०१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, या महामार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती पाऊले उचलली पाहिजेत, असं शरद पवारांनी आपल्या ट्वीटमधून म्हटलंय ."

केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केलीये. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करेल आणि मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला सरकार 5 लाख रुपयांची मदत करणार आहे. केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये आणि राज्य शासनाकडून 5 लाख रुपये असे 7 लाखांची मदत मृतांच्या परिवारांना होणार.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply