Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता, १५ दिवसांपूर्वी पडलेले भगदाड अजूनही तसंच; दुरुस्ती कधी?

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आधी समृद्धी महामार्गावरील अपघात आणि आता महामार्गाची दुरावस्था यामुळे हा महामार्ग चर्चेत आहे. समृद्धी महामार्गावर मोठे खड्डे आणि भगदाड पडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशामध्ये बुलडाण्यात समृद्धी महामार्गावर मोठे भगदाड पडले होते. या घटनेला घडून १५ दिवस झाले तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. या महामार्गाची दुरुस्थी अद्याप केली गेली नाही. त्यामुळे मुंबई कॉरिडॉरवरील एकच लेन सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. या भगदाडामुळे समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होताना टळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग सुरू होऊन जेमतेम एक वर्ष झाले आहे. मात्र या महामार्गाच्या कामाचा दर्जा आता समोर येत आहे. अनेक ठिकाणी या महामार्गावर खड्डे पडले आहेत, तर कुठे भेगा पडल्या आहेत. समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवरील चॅलेंज ३३२.६ वरील दोन डोंगरांना जोडणाऱ्या मोठ्या पूलाला गेल्या १५ दिवसांपूर्वी मोठं भगदाड पडलं होते. जवळपास दोन आठवडे उलटूनही समृद्धी महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

Pune : समाजमाध्यमात पोलीस आयुक्तांच्या नावे बनावट खाते; सायबर चोरट्यांनी पैशांची मागणी केल्याचे उघड

समृद्धी महामार्ग प्रशासनाला भगदाड पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या या पुलावरील दोन लेन गेल्या १५ दिवसांपासून बंद केल्या आहेत. फक्त एकच लेन सुरू आहे. त्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहन चालकांना पुलावर एकच लेन सुरू आहे हे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. भरधाव येणाऱ्या वाहन चालक हा गोंधळून जात असल्याने या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे. मात्र तरीही समृद्धी महामार्ग गेल्या दोन आठवड्यापासून सुस्त बसलेले आहे. दिवसेंदिवस हे भगदाड मोठे होत चालले आहे.

मुंबई कॉरिडोर वरील ३३२.६ वरील याच पुलाचे बांधकाम सुरू असताना भला मोठा गर्डर कोसळून अनेक कामगार जखमी झाले होते. आता त्याच पुलाला मोठं भगदाड पडल्याने समृद्धीच्या या पुलावर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काल रात्री एक मोठा अपघात या ठिकाणी टळला. भरधाव येणाऱ्या ट्रक चालकाला समृद्धीवरील या दोन लेन बंद असून एकच लेन सुरू असल्याचे दिसले नाही त्यामुळे हा चालक ट्रक सरळ घेऊन गेला आणि बसला जाऊन धडकला. या अपघातामध्ये कोणतेही नुकसान झाले नसले तरी मोठ्या अपघाताची शक्यता होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply