Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काही तासांतच दोन मोठे अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ९ जखमी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याजवळ सोमवारी सकाळी काही तासांतच अपघाताच्या दोन मोठ्या घटना घडल्या. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. यातील पहिल्या अपघातात चालकाला डुलकी लागल्याने भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन साईड बेरिअरला धडकली. या घटनेत तिघे ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले.

दुसरी अपघाताची घटना देखील चालकाला डुलकी लागल्यानेच घडली. पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघालेली कार ट्रकला पाठीमागून धडकली. या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचा मास्टर प्लान, पुणे शहराचं रुपडंच पालटणार; मतदारांना कोणती आश्वासने दिली?

दोन्ही अपघातातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सजित शेख (वय ३२) बुर खान (वय ३) नाईमुनिया (वय ४) जयेश मोहंमद (वय ५) आणि फैयाज खान, अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कार नागपूरच्या दिशेने जात होत्या. यातील पहिल्या कारचा नागपूर कॉरिडॉर वरील चॅनेज क्रमांक ३१७ जवळ बॅरिकेट्सला धडकली. या घटनेत तिघे जण मृत्युमुखी पडले. तर ५ गंभीर जखमी झाले. दुसऱ्या अपघातातील व्यक्ती हे पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होते.

नागपूर कॅरीडोरवर चॅनेज क्र ३३८ जवळ कार आली असता चालकाला अचानक डुलकी लागली. कारचा वेग जास्त असल्याने अनियंत्रित होऊन ती ट्रकला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता, की कारचा चक्काचूर झाला.

समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. रविवारी पहाटे देखील समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला होता. अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने छत्तीसगड येथील तिघांचा मृत्यू झाला होता. तर दोघे गंभीर जखमी झाले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply