Samruddhi Highway : शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण; ६०० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला

Samruddhi Highway : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीमध्ये समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच शिर्डीमध्ये दाखल झाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगरमधील कार्यक्रम आटोपून शिर्डीकडे प्रस्थान केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्पाचे लोकार्पण झाले. शिर्डी ते इगतपुरी अशा 80 किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. चा फायदा मुंबई आणि आसपासच्या शहरातून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना या महामार्गाचा लाभ होणार असून 23 जिल्हे समृद्धी महामार्गाने जोडले जाणार आहेत.

701 किमी पैकी 600 किमीचा रस्ता प्रवासासाठी खुला झाला असून या महामार्गावरील वाहतूक आजपासून सुरू झाली आहे. तत्पुर्वी गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. 

दरम्यान, या कार्यक्रमाआधी छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शासन आपल्या दारी' या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply