Sambhajinagar News : संभाजीनगरात आढळला डेंग्यूचा रुग्ण, दोघे संशयित; आरोग्य विभाग सतर्क

Sambhajinagar News : पावसाळा सुरु झाल्यानंतर लागलीच डेंग्यूची साथ पसरण्यास सुरवात झाली आहे. संभाजीनगर शहरात देखील डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर अन्य दोघेजण संशयित रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाकडून साथ रोग निर्मूलन जनजागृती कार्यक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. 

पावसाळा सुरू झाला असल्याने साथ रोगांचा धोका आता वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या तीन वर्षात आलेल्या डेंगू, मलेरियाचे रूग्ण आढळून आलेल्या १६३ अती जोखमीच्या वसहतीवर महापालिकेकडून विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान जून महिन्यात मलेरिया आणि डेंगू १ रुग्ण आणि २ संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग आता चांगलाच सतर्क झाला असून घरोघरी जाऊन साथ रोग निर्मूलनाची जनजागृती करीत आहे. 

फवारणीच्या कामाला सुरवात 

आरोग्य विभागाकडून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यासोबत साथ निर्मूलनासाठी फवारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रामुख्याने डासांचे उत्पत्ती होणारे स्थाने नष्ट करणे, नागरिकांना घर स्वच्छ आणि कोरडा दिवस पाळणे, औषध फवारणी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply