Sambhajinagar Crime : जमिनीसाठी दुसऱ्यांदा मजूर महिलांवर हल्ला; जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडून नऊ वाहने जाळली

Sambhajinagar Crime : कोट्यावधी रुपयांची जमीन बळकावण्यासाठी टोळक्याकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  आठवड्याभरात या टोळक्याने जमिनीची बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांवर दुसऱ्यांदा हल्ला केला. इतकेच नाही तर बांधकाम देखील पडून टाकले आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरात कोट्यावधीच्या जमिनीच्या वादातून सलग दुसऱ्यांदा दहशत माजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. सहारा सिटी समोरील जवळपास ३८ हजार स्क्वेअर फुट जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी ८ दिवसात दुसऱ्यांदा ६० ते ७० जणांनी मजुरांवर हल्ला केला आहे. शिवाय सुरू असलेल्या बांधकाम दोन जेसीबीच्या सहाय्याने पाडून मजुरांच्या ९ दुचाकी जाळल्या आहे. त्यानंतर हे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. 

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

सिडको पोलीसात गुन्हा दाखल 

दरम्यान या प्रकरणी संजय चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून योगेश उर्फ बबलू पठाडे, शरद पवार, ज्ञानेश्वर आवारे, समीर दांडगे, अनंत खिल्लारे यांच्यासह इतर ६० ते ७० जणांच्या जमावाविरुद्ध दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमानुसार या हल्लेखोरा विरोधात एमआयडीसी  सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply