Sambhaji Bhide on Mahatma Gandhi : महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त विधान भोवलं! संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल

Sambhaji Bhide on Mahatma Gandhi  : सतत त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे संभाजी भिडे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. महात्मा गांधींबाबत केलेल्या विधान केल्याने विधानामुळे सध्या वाद पेटला असून संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावती येथील राजापेठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. तसेच यापूर्वी संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये राष्ट्रपित्याबाबत अनुदार उद्‍गार काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपित्याबाबत वाईट टिपणी करणे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून सरकारने आजच बंदोबस्त करून त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर अखेर आज अमरावती येथे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Chandrapur Flood: चंद्रपुरात अतिवृष्टीनंतर सखल भागातील नागरिकांना फटका; 700 हून अधिक नागरिकांना बोटीद्वारे काढण्यात आलं बाहेर

भिडे काय म्हणाले?

अमरावतीच्या बडनेर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांबाबत केलेलं विधान वादात सापडलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा देखील असं संभाजी भिडेंनी केला. दरम्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भुमिका घेत भिडेंना अटक करण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply