IPL 2024 : सामना हरल्यानंतर RCB अन् पंजाबच्या कर्णधारांवर कडक कारवाई! BCCI ने ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंड

Sam Curran and Faf du Plessis Fined : आयपीएल 2024 मध्ये रविवारी दोन सामने खेळल्या गेले. या दिवशी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला गेला. केकेआरने हा रोमांचक सामना जिंकला. याशिवाय दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात पंजाब किंग्जचा दारूण पराभव झाला.

त्याचबरोबर पराभूत कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि सॅम करन यांच्यावरही आयपीएलकडून मोठी कारवाई करण्यात आली. दोघांनाही दंड ठोठावण्यात आला. फाफ डू प्लेसिसला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता, तर सॅम करनला पंचांशी वाद घातल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड भरावा लागला होता.

IPL 2024 Playoffs Scenario RCB : मुश्किल है पर नामुमकिन नहीं...! 'या' समीकरणामुळं RCBला मिळू शकतं प्लेऑफचं तिकीट

खरंतर, आरसीबी संघ निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करू शकला नाही आणि यामुळे त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मोसमात संघाची ही पहिली चूक आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply