Salman Khans Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, दोन्ही आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी

Salman Khans Firing Case :  बॉलिवूड  अभिनेतासलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. या आरोपींना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज येथून अटक केली. त्यानंतर आरोपींना मुंबईत आणण्यात आले. आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. पण कोर्टाने निकाल राखून ठेवत नंतर आरोपींची रवानगी १० दिवसांच्या पोलिस कोठडीत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर आज किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान, मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. पण कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. थोड्यात वेळात कोर्ट आपला निकाल जाहीर केला. कोर्टाने आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मोठी खबरदारी; अजित पवारांनीही घेतला उमेदवारी अर्ज

या सुनावणीदरम्यान पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, याप्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सहभाग आहे. आरोपींना बिहार, हरियाणा, पंजाब आणि गुजरात तसंच उत्तर प्रदेश येथे न्यायचं आहे. या सुनावणी दरम्यान पोलिसांनी अनमोल बिष्णोईची पोस्ट कोर्टात वाचून दाखवली. तसंच गोळीबारासाठी वापरलेली पिस्तूल जप्त करायची असल्याचे देखील पोलिसांनी कोर्टात सांगितले.

आरोपी पनवेल फार्म हाऊसच्या जवळ घर भाड्याने घेऊन राहत आल्याचा पोलिसांनी कोर्टामध्ये खुलासा केला. सांताक्रुझ रेल्वे ट्रॅकजवळ आरोपींनी कपडे बदलले आणि त्याठिकाणावरून पसार झाले असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार राऊंड फायरिंग केले होते. सध्या या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply