Salman Khan House Firing Case : सलमान खानला दिलासा; आरोपीच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाचे महत्वाचे निर्देश

Salman Khan House Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर घडलेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीने आत्महत्या केली होती. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानला मोठा दिलासा दिला आहे. या आरोपीच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. गोळीबाराच्या घटनेतील आरोपीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेतील प्रतिवादी म्हणून सलमानचे नाव काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणात अनुज थापन नावाच्या आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याविरोधात थापनच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु कोर्टाने या याचिकेतून सलमान खानचे प्रतिवादी म्हणून असलेले नाव काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सलमान खानला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

Murlidhar Mohol On Supriya Sule : हे तुमच्या पचणी पडणारे नाही, मंत्रिपदावरून टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना मुरलीधर मोहोळांचे प्रत्युत्तर

सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. यातील एक आरोपी अनुज थापन याने १ मे रोजी आत्महत्या केली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली  होती. सलमान खानच्या घराबाहेर घडलेल्या गोळीबार हल्ल्याची जबाबदारी अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक अकाउंटवरुन जबाबदारी स्विकारण्यात आली होती, तशी पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली होती.

सुपरस्टार सलमान खानच्या  घरावरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तपास सुरूट आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आणखी ४ शूटर्सना अटक केली होती. नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेले आरोपी बिष्णोई गँगसंबंधित आहेत. त्यांचा संबंध थेट पाकिस्तानातून असल्याचा समोर आलं आहे. सलमान खानच्या घरावरील प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply