सलमान खान- सलीम खानImage Credit source: social media
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक, अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचे वडील सलीम खान (Salim Khan) हे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. वडिलांच्या प्रकृतीमुळे सलमानसह संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. 17 फेब्रुवारी रोजी सलीम खान यांना हाय ब्लड प्रेशर आणि ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या ते आयसीयूमध्ये आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र याच दरम्यान, सलमान खान मात्र नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. वडील, सलीम खान यांच्या प्रकृतीची माहिती तसेच मेडिकल डिटेल्स मीडियाला दिल्यामुळे सलमान भडकला. प्रायव्हसीची मागणी करत भविष्यात कोणतेही अपडेट शेअर करू नयेत असे कडक निर्देश सलमानने रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत. वडिलांची प्रकृती, त्यांचे आरोगय याबद्दलची माहिती, हा एका खासगी मुद्दा असून, त्याबद्दल माहिती सार्वजनिक करायची की नाही हा निर्णय फक्त कुटुंबातील सदस्यांनीच घ्यावा अशी खान कुटुंबाची इच्छा असल्याचं समजतं.
डॉक्टरांनी काय दिली माहिती ?
या आठवड्याच्या सुरूवातील सलीम खान यांना लीलावती हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर बुधवारी रुग्णालयाचे डॉक्टर, जजलील पारकर यांनी माध्यमांसमोर येऊन सलीम खान यांच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती दिली, तेव्हा हा वाद सुरू झाला. 89 वर्षांचे सलीम खान यांना मेंदूत किरकोळ रक्तस्त्राव झाला होता आणि रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागले होते असे डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचे वर्णन डॉ्कटरांनी केलं आणि वयामुळे (त्यांना) बरं होण्यास वेळ लागेल असंही डॉक्टरांनी नमूद केलं.
नेमकं झालं तरी काय ?
पण डॉक्टरांनी सलीम खान यांच्या प्रकृतीची माहिती जाहीर केल्याने सलमान खान नाराज झाला. वैद्यकीय माहिती गुप्त ठेवली पाहिजे असं कुटुंबियांचं म्हणणं असल्याचं जवळच्या लोकांनी सांगितलं. त्यानंतर सलमानने हॉस्पिटलच्या प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. जर(सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल) आणखी काही अपडेट्स द्यायचे असतील तर ते रुग्णालय नव्हे, तर कुटुंबीय हे, त्यांच्या चाहत्यांसह शेअर करेल, असं त्याने नमूद केलं.
सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाने लीलावती रुग्णालय प्रशासनाकडे एक विशेष विनंती केली आहे. “सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही मेडिकल अपडेट्स परस्पर मीडियाला देऊ नका. प्रकृतीशी संबंधित माहिती ही गोपनीय असते. चाहत्यांना काळजी वाटणं स्वाभाविक असलं तरी, या प्रकरणातील कोणतीही अधिकृत माहिती केवळ कुटुंबाकडूनच दिली जाईल” असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे.
सलीम खान यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरूच आहेत, परंतु सलमानच्या “नाराजी” नंतर, रुग्णालयाकडून अधिकृत बुलेटिन येण्याची फारशी आशा नाही. या कठीण काळात शांती मिळावी आणि कोणत्याही अफवांशिवाय सलीम खान यांची काळजी घेता यावी अशी कुटुंबाची इच्छा आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती

























Subscribe to my channel

