Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

Dapoli Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी उद्योजक सदानंद कदम हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असतानाच असताना आता तात्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीच्या ताब्यातून दापोली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी आहे. 

मुरुड येथील बहुचर्चित असलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी आता दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले. कोर्टाने त्यांना ३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या देशपांडे यांचा मुक्काम दापोलीच्या सबजेल मध्ये आहे. मुरुड येथील मालमत्ता धारक अनिल दत्तात्रय परब यांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते. तरीही २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मुरुड ग्रामपंचायतीत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे भासवून मुरुड ग्रामपंचायतिची व पर्यायाने शासनाची फसवणूक केली. 

मुरुडचे ग्रामपंचायतिचे तत्कालीन सरपंच सुरेश तुपे व तत्कालीन ग्रामसेवक अनंत कोळी यांनी अभिलेखाची नोंद करताना जागेवर प्रत्यक्ष जावून खातरजमा केली नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल परब, सुरेश तुपे व अनंत कोळी यांच्या विरोधात दापोलीचे गटविकास अधिकारी रूपा दिघे यांनी दापोली पोलीस ठाण्यात ८ नोव्हेंबर २२ तक्रार दाखल केली होती.
 
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करत आहेत. सध्या जयराम देशपांडे यांना शासनाने निलंबित केले असून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता या वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणात आणखी कोणा कोणाला ईडी कडून किंवा पोलिसांकडून अटक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply