Sadichha Sane case : सदिच्छा साने मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा; पोलिसांच्या हाती लागली ‘फ्लोट ट्यूब’

Sadichha Sane case: जे.जे.रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा सानेच्या मृत्यूप्रकरणी आता नवनवीन खुलासे होत आहे. तपास करणाऱ्या पोलिसांना आरोपीकडील फ्लोट ट्यूबवर रक्त सापडले असून त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी सानेच्या पालकांकडे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्र लिहून त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची मागणी केली आहे.

सदिच्छा साने ही पालघर येथील रहिवासी होती. तसेच ती जे. जे. ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली, ती परतलीच नाही.

या घटनेत मिळालेल्या माहितीनुसार, मिथू सिंह आणि सदिच्छा यांच्यात अचानक वाद झाला. सदिच्छाने माझ्या वागण्याबाबत आक्षेप घेत भांडण केले. त्यावेळी तिला मागे ढकलले असता तिचे डोकं दगडाला आदळलं. त्यामुळे झटापटीत तिचा मृत्यू झाला, असं आरोपी मिथू सिंह याने म्हटलं होतं.

तिला ठार मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असा दावा देखील मिथू याने चौकशीत कोला होता. सदिच्छाचा मृतदेह ‘फ्लोट ट्युब’वर ठेऊन पाण्यात नेला, असेही त्याने सांगितले होते. त्यावर एका वर्षानंतरही रक्ताचे नमुने सापडले आहेत.त्यामुळे आता पोलीस त्याबाबत  डीएनए चाचणी करणार आहेत. त्यासाठी सदिच्छा सानेच्या कुटुंबियांना पत्र लिहून रक्ताच्या नमुन्यांची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply