Sadabhau Khot : शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य काढून घेऊ नका अन्यथा आमच्याशी गाठ;सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा

Sadabhau Khot : शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, त्यांचे स्वातंत्र्य काढून घेऊ नका अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत यांनी सरकराला दिला आहे. शेतक-यांच्या विविध समस्यांबाबत खाेत यांनी सांगली येथे माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीकेची झाेड उठवली.

सदाभाऊ खोत म्हणाले राज्यात ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे तेथे पेरणी हंगाम सुरु झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले पाहिजे होते ते अद्याप मिळालेले नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी बॅंकेचा आढावा घ्यावा पीक कर्जाची स्थिती जाणून घ्यावी. कृषी विभागाने सतर्क राहत बाेगस बियाणे विक्री करणा-यांवर कारवाई करावी.

Nilesh Lanke : आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

खाेत पुढं बाेलताना म्हणाले कापसाचे नवे वाण एचटी बीटी बियाणांची लागवड केली तर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. राज्य सरकराने शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. त्यांचे स्वातंत्र्य काढून घेऊ नका अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा खाेत यांनी दिला.

...तर मराठा समाजाला न्याय मिळेल

मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजासाठी काम करतात हे चांगले आहे. त्यांच्यामुळे राज्यात शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. या खासदारांकडून पत्र लिहून घ्या मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास आमचा पाठिंबा राहील. शरद पवार यांच्याकडूनही लिहून घ्यावे मग आम्ही समजू मराठा समाजासाठी जरांगे काम करत होते अन्यथा शरद पवार यांचे काम ते करत होते असा समज होईल असेही खाेत यांनी नमूद केेले.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply