‘RRR’ची ‘द काश्मीर फाइल्स’ला जोरदार टक्कर

एस एस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. त्यांच्या मागील 'बाहुबली' चित्रपटाप्रमाणं या चित्रपटानंही बंपर कमाई सुरू केलीय. 25 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नुकतेच 24 तास उलटले असून 'आरआरआर'नं (RRR Movie) बॉक्स ऑफिसवरील सर्व आकडे आणि विश्लेषकांचा अंदाज चुकवलाय. या चित्रपटानं रिलीजच्या दिवशी 125 कोटींचा व्यवसाय केलाय. दरम्यान, आगामी काळात या चित्रपटाची कमाई अनेक पटीनं वाढणार असल्याचं बोललं जातंय. ज्याचा अंदाज सुरुवातीच्या टप्प्यातच आलाय.

रिलीजपूर्वी या चित्रपटाबाबत अनेक अटकळ बांधल्या जात होत्या आणि त्या सर्व अंदाजांवर हा चित्रपट खरा उतरलाय. चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच भावल्या आहेत. चित्रपटातील अॅक्शन सीन आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडलीय, त्यामुळं या चित्रपटानं कमाईच्या बाबतीत इतर चित्रपटांना मागं टाकलंय.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटापूर्वी फक्त विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट गाजत होता. पण, आता 25 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या 'RRR' चित्रपटानं पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं एक वेगळीच मजल मारलीय. समीक्षकांनी या चित्रपटाला 3.5 स्टार दिले, पण त्याची कमाई पाहता या चित्रपटासाठी 10 स्टारही कमी झाले असते असं वाटतं. कारण, प्रेक्षक या चित्रपटाचं खूप कौतुक करत आहेत. सर्व चित्रपटांप्रमाणंच 'RRR'चा प्रीमियर देखील झाला, परंतु असं असूनही चित्रपटाशी संबंधित कलाकार त्यांच्या कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले आणि तिथं जमलेल्या प्रेक्षकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.

या चित्रपटानं आतापर्यंत भारतात 125 कोटींची कमाई केलीय. या चित्रपटानं केवळ हिंदी भाषिक प्रदेशातून 18 कोटींची कमाई केली असून जगभरात झालेल्या या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं, तर 'RRR'नं बॉक्स ऑफिसवर जगभरात 200 कोटींची कमाई केलीय. ‘RRR’ हा 350 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. या चित्रपटात राम चरण तेजा, एनटीआर ज्युनियर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केलंय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply