Rohit Sharma : अमेरिकेकडून खेळणाऱ्या 'बोरीवली बॉईज'बाबत कर्णधार रोहितचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

Rohit Sharma On Indian American cricketers : भारत आणि अमेरिका यांच्यात टी-20 वर्ल्ड कप सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान संघाचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह टीम इंडिया सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. भारतीय संघ सुपर 8 मध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी दिसत होता. दरम्यान अमेरिकेकडून खेळणाऱ्या भारतीय आणि बोरीवली बॉईज'बाबत कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.
अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, हा सामना जिंकणे कठीण जाईल, हे मला माहीत होते. पण सूर्या आणि दुबे यांनी ज्या प्रकारे संयम राखला, त्यांनी चांगली भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले.

रोहित शर्माला अमेरिकन क्रिकेट संघात खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंबद्दल विचारण्यात आले खास करून बोरीवली बॉईज'बद्दल तेव्हा रोहित शर्मा म्हणाला की, यापैकी बरेच जण आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो आहे, त्यांची प्रगती पाहून खूप आनंद झाला. त्यांना गेल्या वर्षी एमएलसीमध्ये खेळताना पाहिले आहे, ते सर्व मेहनती खेळाडू आहेत.

T20 World Cup 2024 दरम्यान टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर शस्त्रक्रिया, इतके महिने क्रिकेटपासून दूर

सुपर 8 मध्ये पात्र झाल्याबाबत रोहित म्हणाला की, हा मोठा दिलासा आहे, येथे क्रिकेट खेळणे सोपे नव्हते. तिन्हीं सामन्यात आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहावे लागले. या विजयांमुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळेल.

यूएसए कॅम्पमध्ये नितीश कुमार, सौरभ नेत्रावलकर, हरमीत सिंग आणि जसदीप सिंग यांसारख्या खेळाडूंसह अनेक भारतीय चेहरे आहे. नेत्रावलकर अंडर-15 मध्ये सूर्यकुमारसोबत खेळला, तर 2010 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये तो मयंक अग्रवाल, केएल राहुल आणि इतर अनेक स्टार्ससोबत खेळला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अमेरिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 110 धावा केल्या. यात नितीशकुमारने सर्वाधिक 27 धावा केल्या. तर स्टीव्हन टेलरने 24 धावाची खेळी केली. तर टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

टीम इंडियाने 111 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. यादरम्यान सूर्यकुमार यादवने मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याने 49 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. त्याचवेळी शिवम दुबेने नाबाद 31 धावा करत सूर्यकुमार यादवला साथ दिली आणि संघाला विजयापर्यंत नेले. तत्पूर्वी, ऋषभ पंत 18 धावा करून बाद झाला. दुसरीकडे या सामन्यात विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही आणि रोहित शर्मालाही 3 धावा करण्यात यश आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply