Rohit Pawar : कारखान्यावर राजकीय द्वेषातून ईडीची कारवाई; जप्तीच्या अ‍ॅक्शननंतर रोहित पवार यांचा हल्लाबोल

Rohit Pawar : बारामती अॅग्रो कंपनीचा मी संचालक असून तिथे सिंबोलिक जप्तीचे आदेश ईडी करून देण्यात आलेत. परंतु जप्तीची नोटीस आमच्याकडे पोहचली नाहीये. ईडीचे ट्विट पाहिल्यावर आम्हाला ही माहिती कळली. ही जप्ती म्हणजे संपूर्ण जप्ती नाही एक सिंबोलिक आहे. ईडीकडून करण्यात आलेली कारावाई ही राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. 

बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने काल जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. आपण या विरोधात लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामती अॅग्रो कारखाना कोणी ही बंद करू शकत नाही. कामगारांनी घाबरून जायची आवश्यकता नसल्याचं रोहित पवार म्हणालेत.

Pune University : पोह्यामध्ये अळी, उपीटमध्ये केस; पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील किळसवाणा प्रकार समोर

ही कंपनी अप्पासाहेब म्हणजे माझ्या आजोबांनी सुरू केली. त्यानंतर वडिलांनी लक्ष दिले. मी २००७ पासून यात लक्ष द्यायला सुरुवात केली. या कंपनीत ८००० कर्मचारी आणि कामगार काम करतात. राजकीय दृष्टीने कोणी बघत असेल तर तुम्ही लाखो लोकांच्या कुटुंबाशी खेळ करत आहात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. ८ मार्च रोजी बारामती अॅग्रोला प्रेस नोटद्वारे नोटीस आली. ही प्रेस नोट चुकीची आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply