Rohit Pawar : 'राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 28 असताना...'; मराठा आरक्षणावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Rohit Pawar : राज्य सरकारने बोलावलेल्या विधानभवनातील विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेष अधिवशेनात सर्व आमदारांच्या एकमताने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशनात घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणावर आमदार रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

मराठा आरक्षणावर रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार  म्हणाले, 'आम्ही आज मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असला, तरी कुठे ना कुठे अन्याय झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात मराठा समाजाला लोकसंख्या 28 टक्के असताना सरकारने 10 टक्के आरक्षण कसे देण्यात आले. आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं गेलं. त्यानंतर भाजप सरकारकडून 13 टक्के आरक्षण दिलं गेलं'. 

Pune Crime News : पुण्यातील ड्रग्ज विक्रीचे 'दिल्ली' कनेक्शन; पोलिसांच्या छापेमारीत ४००० कोटींचे अमली पदार्थ जप्त

'आता दहा टक्के आरक्षण दिलं गेलं आहे. म्हणजेच भाजप मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी कमी करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. ओबीसीमधून आरक्षण द्यायचं की नाही हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र जे पण आरक्षण दिलं जात आहे, हे टिकलं पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची आहे, असे रोहित पवार म्हणाले.

'राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून मराठा समाजाला दोन महिन्यापूर्वीच आरक्षण दिलं गेलं असतं. यासोबतच धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाला देखील आरक्षण दिले गेले असतं. पंतप्रधान मोदी राज्यात येतात, मात्र या नेत्यांमध्ये त्यांच्याशी या विषयावर बोलण्याचं धाडस नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply