Rohit Pawar : रोहित पवारांनी नाव घेतलेल्या श्वेता सिंग कोण? त्यांचे अनेक बड्या लोकांशी संबंध

“चोरच चोरांची चौकशी करत आहे. श्वेता सिंग या चौकशीला मॅन्युप्युलेट करत आहेत. व्हिके सिंग हे अकाऊंटेबल मॅनेजर आहे. त्यांना अटक का केली नाही? त्यांची चौकशी का झाली नाही? पण व्हिके सिंग पोहोचलेला असल्याने त्याला सेफ केलं जात आहे” असा धक्कादायक आरोप रोहित पवार यांनी केला. त्यांनी आज दिल्लीत अजित पवार विमान अपघात प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत काही खळबळजनक आरोप केले आहेत. अजितदादांचं जे व्हीएसआर कंपनीच विमान कोसळल्यामुळे मृत्यू झाला, त्याचं कंपनीच्या विमानातून एक क्रिकेटरने प्रवास केला होता.

“दिल्लीचा एक क्रिकेटर व्हिएसआरच्या विमानात बसला होता. तेव्हा इंजिन की काही कोसळलं होतं. त्यानंतर तो व्हिएसआरच्या विमानात बसला नाही” असा दावा रोहित पवार यांनी केला. ‘हा नामचीन क्रिकेटपटू आहे. त्याचं नाव सांगणार नाही. चौकशीत ते बाहेर येईलच” असं रोहित पवार म्हणाले.

म्हणून तिने राजीनामा दिला

“दुसरीकडे चीफ फ्लाईट सेफ्टी ऑफिसर त्याची माहिती घेत आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. या तिघांना चौकशीत घेतलं नाही” असं रोहित पवार म्हणाले. “व्हिएसआरमध्ये महिला पायलटने राजीनामा दिला आहे. अनेकांनी राजीनामा दिला होता. या महिलेने लिव्ह इन सर्टिफिकेट देण्यासाठी त्रास दिला होता. फ्लाईट कधीही कोसळू शकतं हे त्यांनी पूर्वी सांगितलं होतं. फ्लाईटच्या अवस्थेवर त्या बोलल्या होत्या. त्यामुळे या महिला पायलटला त्रास दिला होता. म्हणून तिने राजीनामा दिला होता” असा रोहित पवार यांनी दावा केला.

श्वेता सिंग ही पॉवर फुल व्यक्ती

“श्वेता सिंग ही पॉवर फुल व्यक्ती आहे. त्यांचे अनेक बड्या लोकांशी संबंध आहेत. आपलं कोणी काही करू शकत नाही असं त्यांना वाटतं. तुम्ही त्यांच्याबद्दल माहिती काढू शकता” असं रोहित पवार म्हणाले. मागच्या महिन्यात 28 जानेवारीला बारामती येथे अजित पवार यांचं चार्टर्ड विमान कोसळलं. त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या विमान अपघाताबद्दल अनेकांच्या मनात संशय, प्रश्न आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *