Rohit Pawar | अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांनी आज (10 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी या पत्रकार परिषदेत अजितदादांचे विमान नेमके कुठे होते, त्या विमानात नेमके काय होते? याबाबतची तंतोतंत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अजितदादा यांचा विमान अपघात हा घातपाताचा एक भाग असू शकतो, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. हा दावा करताना रोहित पवार यांनी अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातीलच विमान बद्दलचा एक महत्वाचा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला, पवार म्हणाले, विमानाचा ट्रान्सपॉन्डर असतो त्यातून विमान सांगत असतं सॅटेलाईटच्या माध्यमातून मी इथे आहे, माझा स्पीड किती आहे? मी अलाईन झालोय का? एरपोर्टचं जे स्ट्रीप आहे त्याला मी अलाईन झालोय का? तिथून माझा डिस्टन्स किती आहे? माझी हाईट किती आहे? माझं लोकेशन कुठे आहे? एक सॉफ्टवेअर असतं त्याच्या माध्यमातून ही माहिती दिली जाते आणि ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. त्यातून आम्हाला सगळी माहिती कळाली फक्त शेवटच्या एक मिनिटाची माहिती कळाली नाही. कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून बंद केला होता असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *