Republic Day 2023 : कर्तव्य पथावर अवतरला महाराष्ट्रातील 'नारीशक्तीचा जागर'!

दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला दिल्ली कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र ‘नारीशक्तीचा जागर’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला असून यावर्षी राज्यातील साडेतीन शक्तिपीठे तसेच स्त्री शक्तीचा जागर महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसून आले आहे. त्याचबरोबर राज्यातील संस्कृती, पोतराज, वारकरी यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा या नारीशक्तीचे दर्शन संबंध देशवासियांना घरबसल्या पाहायला मिळाला आहे.

तर आज २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपदावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वतीने जो सुंदर चित्ररथ दिसणार आहे. तसेच मुंबईत शिवाजी पार्कवरील पथसंचलनातही जो चित्ररथ दिसणार आहे. ह्या दोन्ही चित्ररथासाठी ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या संकल्पनेचा महिमा सांगणारी वेगवेगळी दोन गाणी लिहिण्याची संधी महाराष्ट्र शासनाने ह्या वर्षी डोंबिवलीकर प्राची ताई गडकरी यांना दिली आहे.

प्राची ताई गडकरी यांच्या या दोन्ही गाण्यांसाठी कौशल इनामदार आणि वैशाली सामंत ह्या दोन दिग्गजांनी संगीताची बाजू सांभाळली आहे. ह्या गाण्यातील काही कडव्यांचे राजधानी दिल्लीत कर्तव्यपदावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथा बरोबर अनेक कलाकारांना सोबतीने सादरीकरण होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply