Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त PM मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा; पद्म पुरस्कार विजेत्यांचेही केले अभिनंदन

Republic Day : देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पद्म पुरस्कार विजेत्यांचेही अभिनंदन केलं आहे. 

काय म्हणाले PM नरेंद्र मोदी?

"देशातील आपल्या सर्व कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद", अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या मान्यवरांचंही अभिनंदन केलं आहे. 

Presidents Medal : कारागृह विभागातील नऊ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

"पद्म पुरस्कारानं सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन. भारत विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानाची कदर करतो. ते त्यांच्या असामान्य कार्याने लोकांना प्रेरणा देत राहोत, हीच अपेक्षा", असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीतही प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधानांची देखील उपस्थिती राहणार आहे.

त्याचबरोबर यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राजपथावरील परेडमध्ये 95 सदस्यीय मार्चिंग तुकडी आणि फ्रान्समधील 33 सदस्यीय बँड तुकडीही या परेडमध्ये सहभागी होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply