Ravindra Waikar : रविंद्र वायकर यांना मोठा दिलासा; भूखंड घोटाळ्याच्या आरोपाविरोधात मुंबई महापालिका पुनर्विचार करणार

Ravindra Waikar : कथित भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीच्या कचाट्यात सापडलेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळ्याचा एफआयआर दाखल करणारी पालिका आत आरक्षित भूखंडावरील हॉटेल बांधण्याचा प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळाप्रकरणात ईडीच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळ्याचा एफ आय आर दाखल करणारी पालिका आता आरक्षित भूखंडावरील हॉटेल बांधण्याच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याच्या तयारीत आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी नौटंकी बंद करावी! देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजप आक्रमक

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. याची सुनावणी आता सोमवारी पार पडणार आहे. या सुनावणीत पालिकेने तक्रार मागे घेतल्यास रविंद्र वायकर यांच्यावरील ईडीचा गुन्हा देखील रद्द होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रविंद्र वायकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळेच पालिकेने युटर्न घेतल्याच्या चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

काय आहेत आरोप?

दरम्यान, जोगेश्वरी येथील वेरावली गावातील भूखंडाचा गैरवापर करणे आणि त्रिपक्षीय कराराची तथ्य लपवून भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची पालिकेकडून परवानगी मिळवल्याचा आरोप आमदार रविंद्र वायकर यांच्यावर आहे. उद्याच्या सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply