Ravikant Tupkar News : ब्रेकिंग! रविकांत तुपकर यांची 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'तून हकालपट्टी; शिस्तभंग समितीची कारवाई

 

Maharashtra : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेपत शिस्तभंग समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष जालिंदर जाधव तसेच पक्षाचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.

शिस्तभंग समितीचे आरोप काय?

"लोकसभेत राजू शेट्टी याचा पराभव झाल्यानंतर आम्ही काम करत आहोत. संघटनेचे नेते रविकात तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही. त्यांना संघटेने लाल दिवा दिला, पद दिले. एकदा पक्ष सोडला परत आले, काम करत राहिले. अलिकडे ते ऊस परिषदेस उपस्थितीत राहिले नाहीत, ते आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत, असे जालिंदर जाधव म्हणाले.

Vijay Wadettiwar : 'मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार योजना, भाजप नगरसेवकाला दिले ४०० कोटी', विजय वडेट्टीवार यांचे खळबळजनक आरोप!

"शिस्तभंग समिती नेमली त्यांना पत्र दिलं ते आले नाहीत. ते पक्ष राज्य कार्यकारणीला पण उपस्थितीत राहिले नाहीत. रविकांत तुपकर मीडियातून बोलत राहिले. आता लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे काम केले. राजू शेट्टी यांच्या विरोधात तुपकर बोलत राहिले, तुपकर यांच्यामुळे चळवळीच नुकसान होत आहे," असे या शिस्तपालन समितीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, "गेल्या तीन चार वर्षात ते पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थितीत राहिले नाहीत. ते नेतृत्वावर आणि पक्षावर प्रश्न चिन्ह उभे करत राहिले. त्यामुळे आजपासून आमच्या पक्षाचा आणि तुपकर यांचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी संघटनेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply