Ravikant Tupkar Health : अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची तब्येत खालावली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

Ravikant Tupkar Health : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं. राज्य सरकार सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर तुपकरांनी बुधवारी आंदोलन मागे घेतलं. कर्जत येथे सोबत आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने त्यांनी महिलांच्या हातून दोन चमचे खिचडी देखील खाल्ली. दरम्यान, अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. 

अचानक अस्वस्थ जाणवू लागल्याने तुपकर यांना मुंबईतील (चर्नी रोड) सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून तुपकर लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत.

Nashik News : ब्रिटिशकालीन पुलाचा कोसळला कठडा; मनमाड शहरातील घटना

रविकांत तुपकर यांचा ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल कमी झाली आहे, याशिवाय त्यांच्या किडनीवरही परिणाम झाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात आंदोलन सुरू केलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply